बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; सतर्कतेची सूचना

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून सध्या धरणातुन १८०६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पारोळा तालुक्यासाठी वरदान असलेले बोरी धरण अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुर्ण भरले असून यात येणाऱ्या जास्तीच्या पाण्याचा विसर्ग दि. ७ रोजी

दुपारी ३ वाजल्यापासून बोरी धरणाचे २ वक्रद्वार ०. ३ मी ने उघडण्यात आलेली आहे.  त्याद्वारे नदीपात्रात एकूण  १८०६ क्युसेस  पाण्याच्या विसर्ग बोरी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. (विसर्ग वाढवण्यात आला आहे)

धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. तरी सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, अशी सुचना जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जळगाव विभाग यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.