सरकारी नोकरी : मुंबई हायकोर्टात भरती, 40 हजार पगार; असा करा अर्ज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या सुवर्णसंधी आहे. मुंबई हायकोर्टात विविध पदांसाठी भरती होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार डेटा एंट्री ऑपरेटर आणि 76 सॉफ्टवेअर प्रोग्रामर पदासाठी अर्ज मागवले आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.  या पदांच्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.

अधिक तपशील 

एकूण : 76 पद

1. डेटा एंट्री ऑपरेटर : 50 पद

* शैक्षणिक अर्हता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे आणि इंग्रजीमध्ये 40 डब्ल्यूपीएम टाइप करणे आवश्यक आहे.

* वयोमर्यादा – वय 21 ते 40 वर्षे दरम्यान.

* महिना पगार : 31,064 रुपये.

2. सॉफ्टवेयर प्रोग्रामर (डेव्हलपर / कोडर्स) : 26 पद

* शैक्षणिक अर्हता : संगणक विज्ञान/ ॲप्लिकेशन/संगणक व्यवस्थापन मधील पदवी किंवा प्रत्यक्ष प्रोग्रामिंगचा 01 वर्षाचा अनुभव असलेली समकक्ष पदवी.

* वयोमर्यादा – वय 21 ते 40 वर्षे दरम्यान.

* महिना पगार : 40,894/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2022

ऑनलाइन अर्जhttps://bhc.gov.in/bhctechpersmsl69/recruitment.php

अधिकृत संकेतस्थळ – http://bombayhighcourt.nic.in

असा करा ऑनलाईन अर्ज 

Step 1: सर्वप्रथम Bombay High Court च्या अधिकृत संकेतस्थळ http://bombayhighcourt.nic.in ला भेट द्या. किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.

Step 2: तिथे Recruitment वर क्लिक करा.

Step 3: Recruitment for the post of Software Programmer (Developer/Coders) and Date Entry Operator या tab मध्ये जाऊन Apply Online वर क्लिक करा

Step 4: एक नवीन पेज ओपण होईल. तिथे Application Form वर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती भरा.

Step 5: आपला फोटो व स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

Step 6: अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.