बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगत तरुणाने घातला गोंधळ, लँडिंग नंतर भलताच कारण आलं समोर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशाने मोठा गोंधळ घातला आहे. आपल्या बागेत बॉम्ब असल्याचा दावा या तरुणाने केला आहे. आकाशात झेप घेत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचं समजताच इतर प्रवाशांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी सर्वजण पळापळ कारू लागले. शेवटी विमान उतरल्यावर भलतंच सत्य समोर आलं.

थ्री इडियट्स हा चित्रपट आपल्या सर्वांनाच परिचयाचा आहे. त्यातला विमानातल सीन आपण पहिला असेलच, त्याच फरहान आपल्या बर नाही असं सांगून विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करायला सांगतो. शक्रवारी देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अकासा एअरलाइन्सचे विमान पुण्याहून दिल्लीतकडे जाणारे विमान मध्येच मुंबईला थांबवण्यात आले. विमान सुरु झाल्यावर एका प्रवाशाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. माझ्या जवळ बॉम्ब आहे, विमान थांबवा मला खाली उतरू द्या अशी आरडाओरड त्याने सुरु केली. विमानाची तात्काळ लँडिंग करण्यात आली. पुढे बीडीडीएस मार्फत त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. तपासणीत ही अफवा असल्याच स्पष्ट झालं आहे.

पुढे तपासात तरुणाच्या मित्राने सांगितले की, त्याची तब्येत ठिक नसल्याने तो अशापद्धतीने ओरडत होता. विमानातून उतरल्यावर तरुणावर योग्य तो औषधोपचार करण्यात आला. तरुणाजळ कोणताही बॉम्ब आढळलेला नाही. मात्र त्याने उडवलेल्या अफवेमुळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

Leave A Reply

Your email address will not be published.