Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»ऐश्वर्या–अभिषेकची यूट्यूबविरुद्ध कोर्टात धाव
    मनोरंजन

    ऐश्वर्या–अभिषेकची यूट्यूबविरुद्ध कोर्टात धाव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ऐश्वर्या–अभिषेकची यूट्यूबविरुद्ध कोर्टात धाव

    एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओंवर बंदी व ४ कोटींची भरपाईची मागणी

    नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क

    बॉलीवूडमधील चर्चित जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी त्यांच्या वैयक्तिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयाची धाव घेतली आहे. यावेळी त्यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगलविरुद्ध ₹४ कोटींच्या भरपाईचा दावा दाखल केला आहे.

    ६ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या या याचिकेत, डीपफेक एआय-जनरेटेड व्हिडिओ त्वरित हटवावेत, तसेच पुन्हा अपलोड होण्यापासून रोखावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. बच्चन दांपत्याने न्यायालयाला कळवले की, अशा व्हिडिओंमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असून एआयच्या गैरवापरावर आळा घालणे आवश्यक आहे.

    “एआय बॉलीवूड इश्क” चॅनेलवर थेट कारवाईची मागणी

    याचिकेत विशेषतः ‘AI Bollywood Ishq’ या यूट्यूब चॅनेलचा उल्लेख आहे. या चॅनेलवर तब्बल २५९ पेक्षा जास्त बनावट एआय व्हिडिओ अपलोड करण्यात आले असून, त्यांना १.६५ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओंपैकी एका क्लिपमध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खान स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दाखवले गेले आहे. याच कारणास्तव जोडप्याने मानहानी म्हणून ₹४ कोटींची भरपाई मागितली आहे.

    बच्चन कुटुंबाचे म्हणणे आहे की, यूट्यूबने एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात आणि त्यांच्या नावे, प्रतिमा व आवाज कोणत्याही एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाऊ नयेत.

    याआधीही अभिषेक आणि ऐश्वर्याने अशाच प्रकारच्या बनावट कंटेंटविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी सतत चर्चा रंगत असतात, मात्र खोट्या अफवांनी त्रस्त झाल्याचे अभिषेकने मुलाखतीत स्पष्ट केले होते.

     

    Abhishek Bachchan Aishwarya Rai Bachchan Bollywood Google YouTube
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif