मोंढाळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरची चौकशीची मागणी…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील मोंढाळे येथे एक डॉक्टर बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरोधात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी संदर्भात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मोंढाळे येथे एक डॉक्टर अवैधरित्या वैद्यकिय व्यवसाय करीत आहे. त्यांचेकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकिय पदवी अथवा पदविका नाही तसेच कोणत्याही वैद्यकिय संघटने कडील वैद्यकिय व्यवसाय करणे साठीचे प्रमाणपत्र नाही व अशा प्रकारे कायदेशीर कोणत्याही प्रकारचे परवाने नसतांना संबंधित डॉक्टर हा मौजे मोंढाळा ता.पाचोरा येथे अवैधपणे वैद्यकिय व्यवसाय करीत आहे. त्याचबरोबर त्यांचे दवाखान्यात कोणत्याही प्रकारचा बोर्ड देखील लावलेला नाही. शेजारी स्वतःचे मेडीकल दुकान देखील आहे, त्याचा देखील परवाना नाही. याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांच्या अवैध वैद्यकिय व्यवसायामुळे अनेकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करुन संबंधित व्यक्ती विरुध्द योग्य ती कारवाई करण्यात यावी. असा तक्रारी अर्ज अजय पाटील रा. खडकदेवळा ता. पाचोरा यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.