Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी तरुणाचा मृतदेह
    अपघात

    भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी तरुणाचा मृतदेह

    ओळख पटविण्याचे रेल्वे पोलिसांचे आवाहन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 9, 2026Updated:July 9, 2026No Comments294 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ रेल्वे स्थानकावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

    लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथील तपासी अंमलदार एएसआय/१७४ श्याम मंगेश बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ जुलै २०२६ रोजी ऑन ड्युटी स्टेशन प्रबंधक, भुसावळ रेल्वे स्थानक यांनी लेखी मेमोद्वारे ट्रेन क्रमांक १९००६ अप च्या एस-५/६ कोचमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित मृतदेह भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील के.एम. क्रमांक PF-01/14 जवळ उतरविण्यात आला. रेल्वेचे डॉ. आदित्य यांनी तपासणी करून संबंधितास मृत घोषित केले.

    या घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथे अकस्मात मृत्यू क्रमांक ७१/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, मृत व्यक्ती बेवारस असल्याने त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    मृत इसमाचे वय अंदाजे २८ वर्षे असून रंग सावळा, चेहरा लांबट, शरीरयष्टी बारीक आहे. डोक्यावर काळे, मोठे व साधूसारखे वाढलेले केस, काळी बारीक मिशी आणि काळी साधूसारखी वाढलेली दाढी आहे. नाक सरळ असून डोळे बारीक आहेत. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा लाईनिंग असलेला मळकट काळपट फुलबाहींचा शर्ट व राखाडी रंगाची मळकट काळपट फुल पँट होती. कपड्यांवर कोणताही टेलर मार्क आढळून आलेला नाही.

    सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नाव, गाव, पत्ता अथवा वारसांबाबत माहिती असल्यास लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथील तपासी अंमलदार एएसआय/१७४ श्याम मंगेश बोरसे यांच्याशी मो. ९८२३७८८४९९ वर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय श्याम मंगेश बोरसे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif