Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जिल्हा परिषद माजी सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह
    गुन्हे वार्ता

    जिल्हा परिषद माजी सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कैलास किसन चौधरी असे त्यांचे नाव आहे. कैलास हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होते. पलशे पंपिंग रोडवरील नाल्यात त्यांचा मृतदेह आढळ्याने खळबळ व्यक्त होतेय. त्यांचा खून झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

    मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह पळसे पंपिंग रोडवरील एका नाल्याच्या पुलाखाली गुरुवारी दुपारी आढळून आला. राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता असलेले चौधरी यांचा त्यांच्या कुटुंबीयांकडून सर्वत्र शोध घेतला जात होता, मात्र ते सापडले नाही. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.

    दरम्यान, पळसे राजवाडा नाल्यावरील पुलाखाली गुरुवारी दुपारी चौधरी यांचा कुजलेल्या अवस्थेत पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी तत्काळ या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कैलास यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांकडून याबाबतचा तपास केला जात आहे.

    चौधरी यांच्या मृत्यूच्या या घटनेमुळे पळसे परिसरात शोककळा पसरली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, चौधरी यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्ट रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार आहे. चौधरी हे पळसे गटातून २००७ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif