विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू; वाकी परिसरात शोककळा

0

विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू; वाकी परिसरात शोककळा

बोदवड (प्रतिनिधी) – बोदवड तालुक्यातील वाकी शिवारात सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा जबर धक्का बसून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना २० ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता उघडकीस आली असून, याबाबत बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत तरुणाचे नाव जितेंद्र प्रल्हाद पाटील (वय ३०, रा. वाकी, ता. बोदवड) असे आहे. जितेंद्र पाटील हे शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले असता विहिरीतील विद्युत पंप सुरू करण्यासाठी खांबावरील लोखंडी पेटी उघडत होते. दरम्यान अचानक विद्युत प्रवाह लागून ते जागीच कोसळले.

तात्काळ त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे वाकी गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी बोदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोहेकॉ विनोद श्रीनाथ करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.