जैना स्तोक ऑनलाईन परीक्षेत बोदवडच्या भावंडांचे यश

0

लोकशाही न्युज नेटवर्क

बोदवड येथील रहीवाशी विरेंद्रकुमार संतोकचंद रेदासनी यांची मुले पलक रेदासनी (वय-१३) आणि आयुष रेदासनी (वय-११) या दोघ बहीन भावंडानी यंदा घेण्यात आलेल्या आत्मलक्ष्यी, साध्वीरत्ना पू. श्री किरणप्रभाजी म.सा. यांच्या ९३ व्या जन्म जयंती निमित्त जैना स्तोक ऑनलाईन परीक्षा संबध महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती . या परिक्षेसाठी महाराष्ट्रातील शेकडो मुला, मुलीनी सहभाग घेतला होता यात बोदवड येथील पलक आणि आयुष रेदासनी या दोन्ही भावंडानी चमकदार कामगीरी करीत प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरलेआहे. या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बोदवड येथील पलक आणि आयुष हे दोघ भावंड शालेय अभ्यासात हुशारअसून त्यांनी मागील वर्षी घेण्यात आलेल्या १२ वर्षापेक्षा लहान बालकांसाठी आयोजीत प्रतिक्रमण राज्यस्तरीय पाठांतर स्पर्धेमध्ये राज्यभरातून उत्तीर्ण झालेल्या मुलां मध्ये पलक रेदासनी (प्रथम), तर आयुष रेदासनी (द्वितीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते नगर येथे आचार्य साम्राट आनंदऋषीजी म. सा. यांची जन्मभूमी असलेल्या चिंचोडी येथे आनंदतीर्थ या पवित्र भुमीवर ‘माँ हुलसा’ पुरस्कार देवून आई, वडीलासह गौरविण्यात आले होते. तसेच बाल बोधिनी व जैन सिद्धांत परिचय परीक्षेत पलक प्रथम तर आयुष द्वितीय आले होते. तसेच दर वर्षी घेण्यात येणाऱ्या जैन पाठवली परीक्षेत देखील टॉपर ठरत आहे. जैन धर्मातील सर्वात कठीन आणि अवघड असलेल्या प्रतिक्रमण, भक्तांबर, पुच्छीसुनम तसेच पच्चीस बोल पूर्ण केले आहे, सद्या ६७ बोल चालू असून ही एक अभिमानस्पद बाब आहे

लहानग्या वयात शालेय अभ्यासा सोबत धार्मिक अभ्यासात सदैव अग्रेसर राहून हे दोघ भावंड रेदासनी परिवारा सह समाजाचे नाव रोशन करीत आहे. ते वाकोद येथील प्रतीष्ठीत व्यापारी सुभाषचंद लोढा यांचे नातवंडे आहेत. ही मूलं या यशाचे श्रेय आपले वडील विरेंद्र रेदासनी, आई सुवर्णा रेदासनी तसेच राहुल बरडिया, सोनल झांबड हे भावंड देतात .

त्यांच्या यशाबद्दल अखिल भारतीय श्वेताबंर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष . मोहनलालचोपडा, जळगाव जिल्ह्याचे समाजशिरोमनी . दलीचंद जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष. अशोक जैन, बोदवड जैन श्रीसंघाचे अध्यक्ष अभय बरडिया, महाराष्ट्र जैन संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशचंद सुराणा, जितेंद्र रेदासनी, चेअरमन . सॅम पांडे, प्राचार्या सौ. अर्चना पांडे,अभय लोढा, अमोलजी लोढा, अजय लोढा, अर्पण लोढा, पारस कोठारी, . प्रफुल्ल बाफणा, राजेंद्र नहार,. झुबंरलाल छाजेड, नरेंद्र रेदासनी, राजेंद्र बुरड़, प्रशांत बोरा, महावीर चोरडीया, वर्धमान ललवाणी, अक्षय छाजेड़ यांनी अभिनदंन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.