नयनरम्य : आज दिसणार ब्लू सुपरमून

नेहमीपेक्षा मोठा चंद्र, अधिक प्रकाशित होणार धरणी

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचा आकार मोठा दिसतो. साधारणपणे चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ४  लाख ०६ हजार ३०० किलोमीटर आहे. परंतु चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचे अंतर ३ लाख ५६ हजार ७०० किलोमीटर होते. त्यावेळी चंद्र मोठा दिसतो. असाच ब्लू सुपरमून आज दिसणार आहे.

 

आज रक्षाबंधन सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत आहे.  या दिवशी एक अद्भूत घटना अंतराळात घडणार असल्याने ही आपल्यासाठी मोठी पर्वणी असणार आहे. आज चंद्र  30% अधिक प्रकाशमान असणार आहे. तसेच 14% मोठा दिसणार आहे. म्हणजे अंतराळात आज मून नाही तर सुपरमून दिसणार आहे. आज निघणाऱ्या चंद्रास ब्लू सुपरमून किंवा स्टरजियॉन सुपरमून (Sturgeon Supermoon) म्हणतात. ब्लू सुपरमून आज भारतात दिसणार आहे.

 

हा तिसरा ब्लू मून

सुपरमून रात्री 11.55 वाजता अधिक प्रकाशमान आणि मोठा दिसणार आहे. सुपरमून दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात दर महिन्याला दिसणारा सुपरमून येतो. म्हणजेच यामध्ये दर दुसऱ्या आठवड्यात दिसणारा चंद्र यामध्ये येतो. दुसरा प्रकार सीजनल सुपरमून आहे. सीजनलमध्ये पहिला पूर्ण चंद्र 22 जून, दुसरा 21 जुलै तिसरा 19 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजेच हा तिसरा ब्लू मून आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी हार्वेस्ट मून तर 22 सप्टेंबर रोजी इक्वीनॉक्स दिसणार आहे.

 

दर दोन ते तीन वर्षांनी दिसतो ब्लू मून

नासानुसार, सीजनल ब्लू मून दर दोन ते तीन वर्षांनी एकदा येतो. यापूर्वी ऑक्टोंबर 2020 मध्ये, ऑगस्ट 2021 मध्ये आला होता. आता 2024 मध्ये हा सुपरमून येत आहे. त्यानंतर मे 2027 मध्ये हा सुपरमून दिसणार आहे. हा सुपरमून तुम्ही तुमच्या घराच्या छतावरुन सहज पाहू शकतात. अधिक चांगल्या पद्धतीने त्याचे निरीक्षण करायचे असेल तर दुर्बिणचा वापर करु शकाल.

Leave A Reply

Your email address will not be published.