Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»नवरदेवाचा बूट लपवण्यावरून रक्तरंजित थरार
    गुन्हे वार्ता

    नवरदेवाचा बूट लपवण्यावरून रक्तरंजित थरार

    थेट चाकूने सपासप वार : चार जखमी एक गंभीर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 28, 2026No Comments920 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    एका विवाह सोहळ्यादरम्यान नवरदेवाचा बूट लपवण्याच्या क्षुल्लक कारणावरून तुफान राडा झाल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. मात्र त्यानंतर थेट पोटात चाकूने वार करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लग्नात एकच गोंधळ उडाला. या घटनेत वधू आणि वराकडील मिळून चौघेजण जखमी झाले आहेत.

    हा संपूर्ण धक्कादायक प्रकार हिंगोलीच्या कळमकोंडा गावामध्ये घडला. येथे पातळे आणि मेने परिवाराचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील वऱ्हाडी मंडळी या विवाह सोहळ्यासाठी दाखल झाली होती. सकाळी पाहुणे मंडळी आल्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात हा शुभविवाह पार पडला. पाहुण्यांनी जेवणही केले, मात्र कन्यादानाचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरदेव नवरीला घेऊन निघण्याच्या तयारीत असताना प्रथा-परंपरेनुसार बूट लपवाछपीचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिथेच हा राडा झाला. या दुर्दैवी घटनेमुळे विवाह सोहळ्याला गालबोट लागले आहे.

    याप्रकरणी श्रावण फुलाजी गाढवे यांच्या तक्रारीवरून नवरदेवाकडील दोन जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नवरीकडील तरुण गणेश जगन डाळ (वय २२) याच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू (ICU) कक्षात उपचार सुरू आहेत. या लग्नाची हिंगोलीत जोरदार चर्चा सुरू असून काही व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

    बूट लपवल्यानंतर मानपानाच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात नवरदेवाकडील तरुणाने धारदार चाकूने गणेश डाळ याच्या पोटावर वार केले. लग्नमंडपात रक्ताचा सडा पडलेला पाहून वऱ्हाडी मंडळी सैरावैरा धावू लागली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    September 16, 2026

    उत्सवाला गालबोट : गणपती मिरवणुकीत घुसला कंटेनर

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif