Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अंध आईचा मृत्यूचा सापळ्यातून बचाव!
    ताज्या बातम्या

    अंध आईचा मृत्यूचा सापळ्यातून बचाव!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 14, 2026No Comments408 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिमुकल्याचा बळी : दोघे आरोपी ताब्यात

    यावल : तालुक्यातील किनगाव शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या प्रकरणाला पोलिसांच्या सखोल तपासानंतर धक्कादायक वळण मिळाले असून, साडेतीन वर्षांच्या अंध मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याची आजी आणि वडिलांविरुद्ध खुनाचा तसेच आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दि. 13 जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास किनगाव येथील शेतातील विहिरीत 70 टक्के दृष्टिदोष असलेल्या सरस्वती स्वप्निल पाटील (वय 27) आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत सरस्वती या लाकडी आधाराला धरून बचावल्या, मात्र कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत केलेल्या चौकशीत सरस्वती यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, विहिरीच्या पूजेसाठी गेले असताना सासू आशाबाई पाटील यांनी त्यांना आणि मुलाला विहिरीत ढकलले. या कृत्यात पती स्वप्निल पाटील याचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती दोघेही दृष्टिहीन असून, जन्माला येणारे अपत्यही अंध असल्याचे डॉक्टरांनी गर्भावस्थेत सांगितले होते. त्यावेळी गर्भपात करण्याचा आग्रह करण्यात आला होता. मात्र फिर्यादीने मुलाला जन्म दिल्यानंतर कौटुंबिक वाद वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    September 16, 2026

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif