Tuesday, November 29, 2022

स्टॅम्प पेपरचा काळाबाजार

- Advertisement -

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जिल्ह्यातील अमळनेर येथे स्पॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू आहे. व्हेंडर्सकडून स्टॅम्प पेपरची कृत्रिम टंचाई अधिक दराने विक्री करण्यात येत आहे. १०० रुपयांचे स्टॅम्प पेपरसाठी १२० ते १३० रुपये मोजावे लागत आहे. जादा किंमत आकारून त्यांच्याकडून नागरिकांची लूट होत आहे. स्टॅम्प व्हेंडर्सवर कार्यालयात हा धंदा खुलेआम सुरू आहे. स्टॅम्प व्हेंडर्सवर होणारी कारवाई थातूरमातूर असल्यामुळे त्यांचीही हिंमत वाढली आहे. तातडीचे काम आणि झंझट नको म्हणून नागरिकही जास्त किमतीत स्टॅम्प खरेदी करताना दिसत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

स्टॅम्प व्हेंडर्सवर कारवाईचे अधिकार आहेत. पण या विभागाचे अधिकारी तक्रारींची क्वचितच दखल घेतात. दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि अन्य विविध कामांसाठी स्टॅम्पपेपरची गरज भासते. विद्यार्थ्यांच्या निकालानंतर स्टॅम्पपेपरचा काळाबाजार का होतो, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय अनधिकृत व्हेंडर्सनेही स्टॅम्पविक्रीचा धंदा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

शपथपत्र, भाडेपत्र, जमीन खरेदी- विक्री, जातीचे प्रमाणपत्र, जन्माचे प्रमाणपत्र, नळ व विजेच्या कनेक्शनसह बहुतांश कामांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते. काळाप्रमाणे सध्या स्टॅम्पचा तुटवडा नाहीच. स्टॅम्प व्हेंडर्सला सहजरीत्या उपलब्ध होत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या