Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»भुसावळातील भाजपाची सभा ठरली फियास्को!
    राजकारण

    भुसावळातील भाजपाची सभा ठरली फियास्को!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 25, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ येथे नगरपालिक व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित करण्यात आलेली भारतीय जनता पक्षाची प्रचार सभा मोठ्या अपेक्षेने आयोजित करण्यात आली होती; मात्र संघटनात्मक अडथळे, नियोजनातील त्रुटी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल अडीच तास उशिरा झालेल्या आगमनामुळे संपूर्ण सभा अक्षरशः फिस्कटली. भुसावळकर नागरिकांनी दीर्घ प्रतीक्षेनंतर सभेला पाठ फिरवल्याने ही सभा ‘फियास्को’ ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये होती.

    भुसावळ शहरातील प्रमुख मैदानावर दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा जाहीर करण्यात आली होती. सकाळपासूनच शहरात या सभेबाबत चर्चा रंगली होती, भाजपाचे उमेदवार, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीची अपेक्षा व्यक्त केली होती. शहरातील रस्त्यांवर आणि परिसरात जाहिराती, बॅनर, पोस्टर यांचा मोठा गाजावाजा होता. मात्र दुपारी दोन वाजताच नागरिक आणि कार्यकर्ते जमू लागले असले तरी मुख्यमंत्री वेळेत न पोहोचता सभा सतत पुढे ढकलताना दिसली.

    मुख्यमंत्री अखेर सायंकाळी 5.20 वाजता सभास्थळी दाखल झाले. दरम्यान नागरिकांनी या सभेकडे पाठ फिरविली. काही काळ गर्दी दिसत असली तरी वेळ जसजसा पुढे जात गेला तसतशी उपस्थिती लक्षणीयरीत्या कमी होत गेली. एकेका गटाने आरामशीरपणे मैदानातून निघण्यास सुरुवात केली आणि काहींनी तर यावर नाराजीही व्यक्त केली.

    नियोजनात मोठ्या त्रुटी

    निवडणूक प्रभारी तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांच्या नियोजनातील त्रुटींचा उल्लेख अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्येही ऐकायला मिळाला. सभेची वेळ निश्चित असूनही प्रमुख नेत्यांच्या आगमनाबाबत स्पष्ट माहिती दिली गेली नाही, तसेच अपेक्षित प्रमाणात सावलीची, पाण्याची किंवा बैठकीची व्यवस्था करण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी बोलून दाखवली.

    सत्काराला दिला फाटा

    सभेला येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा ठरलेला असतो; मात्र उपस्थिती क्षीण झाल्याने आणि नागरिकांची हालहवाल पाहता आयोजक मंडळींनी तो सोपस्कारही पार न पाडता तो रद्द करण्यात आला. अनेक मान्यवर मात्र सभास्थळी ताटकळत थांबले होते. संपूर्ण व्यवस्थापन ढिसाळपणे हाताळल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. काही ठिकाणी खुर्च्यांच्या रांगा रिकाम्या दिसत होत्या. स्थानिक राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या नियोजनातील त्रुटी पक्षाच्या प्रतिमेला धोका ठरू शकतात.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif