Thursday, August 11, 2022

भाजपच्या ४२ व्या वर्धापननिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भाजपच्या ४२ व्या वर्धापन निमित्त ६ एप्रिल ते १६ एप्रिल अभिमान अभियान राबविणार आमदार सुरेश भोळे (राजु मामा) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वात भाजपा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या चार राज्यांमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करून पूर्ण बहुमतात सरकार स्थापन केले असुन ही आनंदाची व गौरवाची बाब आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भाजपाची विचारधारा व अंत्योदयाचा संकल्प देत पंतप्रधान देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता व देशसेवेसाठी कार्यरत आहेत. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानानुसार महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात ६ एप्रिल- भाजपा स्थापना दिवसापासुन ते १६ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम खालील प्रमाणे घेण्यात येणार आहे.

दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता वसंतस्मृती भाजपा जिल्हा कार्यालय बळीराम पेठ येथे जिल्हाध्यक्ष शहराचे आमदार सुरेश दामू भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत पक्ष ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल तसेच सकाळी १० वाजता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्त्याना संबोधन मोठ्या एलइडी स्क्रीन द्वारे लाइव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

७ एप्रिल – जागतिक आरोग्यदिन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१० एप्रिल- राम नवमी उत्सव निमित्त राम मंदिराचे फलक व कारसेवक यांचा सन्मान.
११ एप्रिल – महात्मा फुले जयंतीनिमित्त निमित्त प्रत्येक चौकात अभिवादन कार्यक्रम.
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मंडलात अभिवादन व चौकाचौकात कार्यक्रम.
१६ एप्रिल- हनुमान जयंती निमित्त मंडलात हुनुमान मंदिरात जास्तीत जास्त लहान मुलांना एकत्र करून हनुमान चालीसा वाचन करणे, असे कार्याक्रम राबविण्यात येणार आहे.

सदरील कार्यक्रमास सर्व जिल्हापदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख व कार्यकर्त्यांनी आपआपल्या मंडलात व आपल्या बुथवर पक्षाचा ध्वजवंदन करावे व पक्ष कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या