जळगाव जिल्ह्यात साडेपाच लाख नागरिकांनी घेतले भाजपचे सदस्यत्व

६ एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्त कमळाची रांगोळी काढण्याचे आवाहन

0

जळगाव जिल्ह्यात साडेपाच लाख नागरिकांनी घेतले भाजपचे सदस्यत्व

६ एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्त कमळाची रांगोळी काढण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५.५ लाख नागरिकांनी पक्षाचे सदस्यत्व स्विकारले आहे. ही माहिती भाजपा प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार अमोल जावळे, महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, राधेश्याम चौधरी, नंदू महाजन, अरविंद देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, “जळगाव शहरातील विविध बूथ केंद्रांवर ५ हजारांहून अधिक नागरिकांनी सक्रिय सदस्यत्व स्वीकारले आहे. यामुळे भाजपचे शहरातील संघटन आणखी मजबूत झाले आहे.”

जिल्ह्यातील सदस्य नोंदणीत महिलांचा ६० टक्के सहभाग राहिला असून पुरुष सदस्यांची टक्केवारी ४० इतकी आहे. महिलांचा वाढता सहभाग हा पक्षासाठी विशेष उत्साहवर्धक असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात २५ लाख सदस्यांची नोंदणी
धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये एकत्रितपणे सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानात ऑनलाइन पद्धतीने २४ लाख आणि ऑफलाइन १ लाख सदस्यांनी नोंदणी केली आहे.

१७६ मंडळांवर संघटनात्मक उपक्रम राबवले
जळगाव जिल्ह्यातील १७६ मंडळांवर सदस्य नोंदणीसाठी संघटनात्मक उपक्रम आणि जनजागृती मोहीम राबवली गेली. नागरिकांनी भाजपवर दाखवलेली आत्मीयता लक्षवेधी ठरली असून भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून अधिक बळकट होत असल्याचे चौधरी यांनी नमूद केले.

६ एप्रिलला भाजप स्थापना दिन:
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरासमोरील अंगणात कमळाची रांगोळी काढावी, असे आवाहनही चौधरी यांनी यावेळी केले. या दिवशी विविध सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.