महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपकडून 12 तर शिवसेनेने घेतले 4 अर्ज

6 फेब्रुवारीला होणार निवड : राजकीय हालचाल गतीमान

0

जळगाव : महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी भाजपकडून प्रत्येकी 6 असे 12 अर्ज शुक्रवारी अंतिम दिवशी घेण्यात आले आहे. तर शिवसेनेकडूनही महापौरपदासाठी 2 तर उपमहापौरपदासाठी 2 असे 4 अर्ज घेण्यात आले. दि. 2 फेब्रुवारी रोजी कोण अर्ज भरणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
दि. 6 फेब्रुवारी रोजी निवडीसाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 46 तर शिवसेना शिंदे गटाने 22 जागांवर यश मिळविले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष असे मिळून आता महायुतीचे 70 संख्याबळ झाले आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचा व उपमहापौर शिवसेनेचा होणार हे निश्चित झाले आहे. अंतिम दिवशी शुक्रवार दि. 30 रोजी भाजपचे शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह गटनेते प्रकाश बालाणी, उपगटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील हे मनपात दाखल होत
नगरसचिव सतिश शुक्ला यांच्याकडे प्रकाश बालाणी यांनी महापौरपदासाठी 4 फॉर्म घेतले. नितीन बरडे यांनी उपमहापौरपदासाठी 4 फॉर्म घेतले. प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी 2 फॉर्म घेतले. याप्रकारे 10 अर्ज महापौरपदासाठी घेण्यात आले. डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी उपमहापौरपदासाठी देखील दोन फॉर्म घेतले. आम्ही महायुतीकडून 12 अर्ज घेतल्याची माहिती गटनेते, उपगटनेत्यांकडून देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक मनोज चौधरी यांनी महापौरपदासाठी 2 तर उपमहापौर पदासाठी 2 अर्ज घेतले आहे. आता उमेदवारी अर्ज कोण भरते याकडे लक्ष लागून आहे.

2 रोजी होणार अर्ज दाखल
मनपाच्या महापौर, उपमहापौर पदासाठी दि. 2 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्यात येणार असून दि. 6 रोजी विशेष महासभेत निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून वरिष्ठ निर्णय घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.