Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»निवडणुकीसाठी भाजपकडून मास्टारप्लान तयार
    महाराष्ट्र

    निवडणुकीसाठी भाजपकडून मास्टारप्लान तयार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मास्टारप्लान तयार करण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे खुले आमंत्रण भाजपकडून देण्यात येणार आहे. पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना घ्या, पण कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देऊ नका,” असा स्थानिक नेत्यांना भाजपकडून स्पष्ट आदेश देण्यात आलाय.

     

    भाजपमध्ये इनकमिंगची शक्यता

    कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत ही रणनीती ठरवण्यात आल्याचे समोर आलेय. भाजपची लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘मिनी विधानसभा’प्रमाणे गांभीर्याने घेऊन विजय मिळवण्यावर आहे. त्यासाठी मविआच्या नेत्यांना फोडण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊ शकतात. वसई-विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इनकमिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

     

    स्पष्ट आणि आक्रमक रणनीती

    महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे एक प्रकारे मिनी विधानसभा समजल्या जातात. विशेषतः महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यामधून होणाऱ्या या निवडणुका केवळ स्थानिक मुद्द्यांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या राज्यातील आगामी विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या राजकीय समि‍करणांवरही परिणाम घडवू शकतात. भाजपने याच संदर्भाने लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विभागात एक निर्णायक बैठक घेतली असून, यामध्ये एक स्पष्ट आणि आक्रमक रणनीती स्वीकारली आहे.

     

    कार्यकर्त्यांवर अन्याय नको.. 

    भाजपने या बैठकीत निर्णय घेतला की, महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील प्रभावशाली नेते जर पक्षात येण्यास इच्छूक असतील, तर त्यांना प्रवेश दिला जाईल. अर्थात, यामागे स्पष्ट राजकीय हिशेब आहे. स्थानिक नेत्यांचे व्यक्तिगत मतदारसंघांमधील वर्चस्व भाजपला या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवून देऊ शकतं. या निर्णयामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमध्ये घेताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्या ह्या शब्दांत पक्षश्रेष्ठींनी आपल्या स्थानिक नेत्यांना स्पष्ट सूचना दिली आहे. त्यामुळे भाजप स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा विरोध टाळत योग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला, तर त्याचा परिणामही दूरगामी ठरू शकतो.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif