डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

समाजाबद्दल का लिहतो? यावरून वाद घालत दोन अज्ञात तरुणांनी भाजपचे सोशल मीडिया संयोजक जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयात घुसून कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना आज दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी उपाध्याय यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

जुगल उपाध्याय हे भाजपचे सोशल मीडिया संयोजक आहेत. भाजपच्या सोशल मीडियावर समाजाबद्दल पोस्ट टाकण्यात आल्याचा आरोप करत काही तरुणांनी आज दुपारच्या सुमारास उपाध्याय यांच्या डोंबिवली स्टेशन समोरील कार्यालयात प्रवेश केला. रुमालाने चेहरा झाकत आलेल्या या तरुणांनी कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर शिवीगाळ करते निघून गेले. याबाबत तक्रार उपाध्याय यांनी केली आहे. एकूणच विधानसभा निवडणुका रंगात आलेल्या या असतानाच डोंबिवलीत राजकारण तापू लागल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.