मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदेंनी दोन तृतीयांश शिवसेना फोडली असून सर्व आमदार गुवाहाटीला नेले आहेत. आजही सहा आमदारा गुवाहाटीला जाऊन मिळाले आहेत. अशातच भाजपाने आता सत्तेचे वातावरण दिसू लागताच शिंदेंना ऑफर दिल्याचे समजते आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या गोटात शांतता होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. आजपर्यंत फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शिंदे गटाला आपल्याकडे वळविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यातच शिंदेंकडे शिवसेनाच नाही तर अपक्ष आमदारही असल्याने शिंदेंचे पारडे मजबूत झाले आहे.
एकनाथ शिंदे आज राज्यपालांना वेगळ्या गटाचे पत्र देणार असून त्यास भाजपाचा देखील पाठिंबा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच भाजपाने एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर दिल्याचे समजते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना उप मुख्यमंत्री पद, ८ कॅबिनेट मंत्री पदे, ५ राज्य मंत्री पदे देण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्रातही सत्तेत वाटा देण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रात दोन मंत्री पदे देण्यात येतील.
एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मागे ठेवलेल्या आपल्या आमदारांनाही आज बोलावून घेतले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंशी बोलणी संपली असून शिंदे आता भाजपाने दिलेल्या ऑफरवर चर्चा करणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे ४६ आमदार आहेत. तर शिवसेनेने हा दावा फेटाळला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.