भाजप- मनसेची युती होणार ?; फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्त्वादी भूमिका घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे, भाजप आणि मनसे युती होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय.

मनसेनं हिंदुत्त्वादी भूमिका घेतल्याने भाजप आणि मनसेची युती होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, मनसेसोबत युतीच्या बातम्या, चर्चा ह्या कलोकल्पित आहेत. सध्यातरी तसा कुठलाही प्रस्ताव नाही. तसेच, औपचारीक चर्चाही या युतीसंदर्भात आमची झालेली नाही. मात्र, राज ठाकरेंनी सध्या जे मुद्दे घेतले आहेत. मग तो हिंदुत्त्वाचा मुद्दा असो, किंवा आता त्यांनी उचलून धरलेला भोंग्यांचा मुद्दा असो. आम्हीही हे मुद्दे यापूर्वी घेतलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झाले पाहिजे, असे म्हणत फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चा स्पष्ट शब्दात खोट्या असल्याचं म्हटलं आहे.

तसेच केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनाही मनसेसोबतच्या युतीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर दानवे म्हणाले की, जनमताचा कौल घेऊन निर्णय घ्यावा लागेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here