राऊत, परब याना पोलीस कोठोडीत जावे लागेल; सोमय्यांचा इशारा

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मुंबई;  प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांच्याबाबत चौकशीत जे सांगलेय ते पाहून अनिल परब आणि संजय राऊत यांना जेलमध्ये जावे लागणार असल्याचा इशारा आज माजी खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीवर आरोपांची सरबत्ती करणारे किरीट सोमय्या यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांना लक्ष्य केले आहे.

ते म्हणाले की, चायवाला, दारुवाला हे उद्धव ठाकरेंचे कारनामे आहेत. वाईन कंपनीसाठी पॉलिसी बदलली गेली. संजय राऊत पार्टनर बनले. जी कंपनी अस्तित्वात नाही त्यांना कंत्राट दिलं. एका चहावाल्याला कंत्राट दिलं. कोविड कंपनी कधी स्थापन झाली नाही त्यांना कंत्राट कसं दिलं गेलं? असा सवाल त्यांनी केला.

सोमय्या पुढे म्हणाले की, या घोटाळ्यात हे सगळे पार्टनर आहेत. म्हणून एकमेकांना वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.  प्रविण राऊतांपासून इतरांनी ईडीला जी माहिती दिली आहे. त्यावरून अनिल परब आणि संजय राऊत यांना लवकरच जेलमध्ये जावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या दोघांसाठी अनिल देशमुखांबाजूच्या खोल्या सॅनिटाईज करून घ्याव्यात, असं ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here