राज्यसभा निवडणुकीत भाजपला यश; जळगावात आनंदोत्सव साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांची राज्यसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल विजय उत्सव आदरणीय जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश (राजूमामा) भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते आज “वसंत स्मृती” भाजप कार्यालय येथे सकाळी फटाके फोडून व पेढे वाटप करून साजरे करण्यात आला.

यावेळी गटनेता भगत बालानी, उज्वला बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा पदाधिकारी सुभाष तात्या शौचे, अरविंद देशमुख, महेश चौधरी, ज्योतीताई निंबोरे, रेखाताई कुलकर्णी, बापू ठाकरे, प्रकाश पंडित, धिरज वर्मा, गणेश माळी, योगेश पाटील, वंदनाताई पाटील, मंडळ अध्यक्ष संजय लुल्ला, आघाडी पदाधिकारी दिप्तीताई चिरमाड़े, रेखाताई वर्मा, सरोज पाठक, ज्योती राजपूत, शोभा कुलकर्णी, छाया सारस्वत, ज्योती बर्गे, युवा मोर्चा पदाधिकारी भूषण भोळे, मिलिंद चौधरी, दिशांत दोशी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरिकर, सागर पाटील, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here