Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महायुतीची २१२ जागांवर मुसंडी
    जळगाव

    महायुतीची २१२ जागांवर मुसंडी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महायुतीची २१२ जागांवर मुसंडी
    फडणवीसांचा प्रभाव कायम; भाजप ठरतोय सर्वात मोठा पक्ष

    मुंबई / वृत्तसंस्था : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना महायुतीने निर्णायक आघाडी घेतली असून तब्बल २१२ जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखत सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची छाप पुन्हा एकदा दिसून येत आहे.

    आतापर्यंत उपलब्ध निकालांनुसार भाजप १२७ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडीला सुमारे ५४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काही ठिकाणी मतमोजणी अंतिम टप्प्यात असून भाजपची आघाडी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.

    मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेत भाजपच्या गीता पवार यांनी विजय मिळवला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपालिकेत भाजपचे अभय आव्हाड यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत बाजी मारली आहे. या निकालांमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातही भाजपची पकड भक्कम असल्याचे स्पष्ट होत आहे.

    दरम्यान, भुसावळ नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून रविवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रजनी सावकारे या आघाडीवर असून प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

    एकूणच नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून भाजप व महायुतीची ताकद अधोरेखित होत असून राज्याच्या राजकारणात फडणवीस यांची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

    #bjp Chief Minister Devendra Fadnavis
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif