भाजपच्या खेळीने दोस्तीत होणार कुस्ती ?

भाजपचा पालकमंत्री नाही तिथे संपर्कमंत्री : जळगावसाठी गिरीश महाजन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र सरकार आणि भाजप संघटनेत समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नवे पद तयार करण्यात आली आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात ‘संपर्कमंत्री’ नियुक्त केले जात आहेत. महायुतीमधील पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपने हे नवे पद निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संपर्कमंत्र्यांची नेमणूक करून भाजपने अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा शह देण्याचा भाजपचा लक्ष्य असल्याचे देखील बोलले जात आहे. जळगाव जिल्ह्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महहाजन यांची संपर्कमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

संपर्कमंत्र्यांचे मुख्य काम कार्यकर्त्यांच्या समस्यांवर लक्ष देणे आणि त्यांच्या कामकाजासाठी मार्गदर्शन करणे असे असणार आहे. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांची असंतुष्टी कमी होईल आणि सरकारमध्ये त्यांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांची आहे. भाजपने संपर्कमंत्र्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेना, तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपने संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे महायुतीतल असलेल्या मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर लक्ष राहावे, यासाठी भाजपने मोठी खेळी खेळल्याची चर्चा या संपर्कमंत्री पदामुळे रंगल्या आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजप पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्यालेच मिळावे, असा पक्षांचा आणि नेत्यांचे प्रयत्न असतो. मात्र यावेळी तीन पक्ष एकत्र लढले आणि जिंकले त्यामुळे काही ठिकाणी जागांच्या आणि मंत्रीपदांच्या बाबतीत पक्षांना हात अखडता घ्यावा लागला. परंतु तरीही तिन्ही पक्षातले काही नेते पदावरून, मग ते पालकमंत्री असो वा मंत्रीपद असो यावरून नाराज झाले आहेत. भाजपमधील नाराजी घालवण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी भाजपने संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण केल्याची चर्चा आहे.

 

अशी असणार जबाबदारी

पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडून राहू नये, त्याचबरोबर सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे जाऊन आपल्या पक्षाच्या संपर्कमंत्री कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतील. युतीच्या राजकारणात कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये वा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या बाबत माहिती देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी संघटना आणि सरकारच्या समन्वयासाठी संपर्कमंत्री असतील असे सांगितले आहे.

 

यांची झाली नियुक्ती

जळगाव – गिरीश महाजन, गोंदिया – पंकज भोयर, बुलढाणा – आकाश फुंडकर,

यवतमाळ – अशोक उईके, वाशिम – राधाकृष्ण विखे पाटील, बीड – पंकजा मुंडे,

धाराशिव – जयकुमार गोरे, हिंगोली – मेघना बोर्डीकर, नंदुरबार – जयकुमार रावल,

ठाणे – गणेश नाईक, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, संभाजीनगर- अतुल सावे, पुणे- चंद्रकांत पाटील, कोल्हापूर- माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.