जम्मू, लोकशाही न्युज नेटवर्क
शांततापूर्ण जम्मू प्रदेशातील प्राणघातक दहशतवादी हल्ले हे भाजपच्या कथित अपयशाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे या पक्षाने जम्मू-काश्मीरच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मांडले. केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादासाठी एनसी, काँग्रेस आणि पीडीपीवर आरोप करून भाजपने पाकिस्तानला ‘क्लीन चिट’ दिली आहे, असे ते म्हणाले.
उधमपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात ‘एनसी’चे उमेदवार सुनील वर्मा यांच्या समर्थनार्थ आयोजित ओम यांनी निवडणूक रॅली काढली. यावेळी ओमर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. शहा यांनी ‘एनसी’, काँग्रेस आणि ‘पीडीपी’ या पक्षांना दहशतवादासाठी जबाबदार धरल्याच्या वक्तव्य केले आहे. त्याचा संदर्भ देत ओमर म्हणाले, की दहशतवाद्याच्या मुद्यावर बोलताना भाजप नेते इथे आम्हाला दोष देतात, पण जेव्हा ते केंद्रशासित प्रदेशाबाहेर असतात तेव्हा ते पाकिस्तानला जबाबदार धरतात, असे ओमर म्हणाले.
भाजप नेतृत्वाने आपल्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल्ला म्हणाले, की इतके दिवस सत्तेबाहेर असूनही, पंतप्रधान किंवा गृहमंत्री जर त्यांच्या भाषणात माझी आठवण करत असतील तर याचा अर्थ मी काहीतरी चांगले केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील खराब कामगिरीमुळे भाजप अस्वस्थ आहे. पहिल्या दोन टप्प्यात भाजपची कोणतीही विशेष कामगिरी झाली नाही. आमच्या माहितीनुसार नौशेरा मतदारसंघातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना पराभूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ते आम्हाला लक्ष्य करीत आहेत,’ असे ते म्हणाले. भाजपने जनतेची माफी मागावीजम्मू भागात दहशतवादाची परिस्थिती काय आहे, जिथे आपल्या शूर दलाच्या जवानांना वारंवार लक्ष्य केले जाते? 2014 नंतर जम्मू भागात दहशतवाद का पसरला याचे उत्तर भाजपने आधी दिले पाहिजे, विशेषत: गेल्या तीन वर्षांत जेव्हा त्याचा आलेख उंचावला होता, असे माजी मुख्यमंत्री ओमर म्हणाले.
भाजपाने माफी मागावी!
जम्मूमध्ये असे एकही ठिकाण नाही जिथे दहशतवादी हल्ले झाले नाहीत. हे त्यांचे (भाजप सरकार) आणि पक्षाचे अपयश दर्शवते. ते मान्य करून लोकांकडून माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.