मोटारसायकल चोरणारी सराईत टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. त्याच पाश्वभूमीवर  मोठी कारवाई करण्यात आली आहे.  मोटारसायकल चोरणारी सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.  रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव ता.  मालेगाव) हा त्याचे साथीदार आकाश गोबिंद गायकवाड (रा.  जळगाव फाटा निफाड) आणि  दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव ता मालेगाव) यांच्या सोबत मोटार सायकल चोरी केल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून सदर पथकाने भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याबाबत माहिती काढून तो जळगाव फाटा, निफाड ता. निफाड येथे मिळून आला. त्याचा साथीदार आकाश गोविंद गायकवाड  हा सटाणा येथे मिळून आला. तसेच दुसरा साथीदार दादु संजय सोनवणे हा दरेगाव ता. मालेगाव येथे मिळुन आला.

सदर पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील मोटार सायकली बाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली. आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ, आकाश गोविंद गायकवाड, दादु संजय सोनवणे  यांनी चाळीसगाव शहर व तालुका भागातुन चोरी केलेल्या तीन मोटारसायकली काढून दिल्या.

सदर मोटार सायकली चोरी बाबत १) चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गुरनं १३४/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२) २) चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गुरनं १३५/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२), ३) मेहुणबारे पो.स्टे.ला गुरनं ८८/२०२५ भा.न्या.सं.३०३(२), असे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापर केलेले दुचाकी मोटार सायकल देखील काढून दिल्याने आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ, आकाश गोबिंद गायकवाड, दादू संजय सोनवणे यांना चोरी केलेल्या सुमारे  २,४५,००० रुपये किमतीच्या ०४ दुचाकी असा मुद्देमाल चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गुरनं १३४/२०२५ भा.न्या.सं. २०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता चाळीसागव शहर पोलीस स्टेशनच्या  ताब्यात देण्यात आले आहे.आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ यावर जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, चोरीचे १३ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी.शेखर डोमाळे, पो.ह मुरलीधर धनगर, पो.ना महेश पाटील, पो.का भुषण शेलार, पो.का सागर पाटील, पो.का मिलींद जाधव, पो.का चापोह दिपक चौधरी, पो.ह भारत पाटील सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली असून चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गुरनं १३४/२०२५ भा.न्या.सं. २०३ (२) या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल चोरी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.