Saturday, November 26, 2022

बलात्काऱ्याला अजब शिक्षा, उठाबशा काढ आणि जा.. (व्हिडीओ)

- Advertisement -

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

बिहारमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला बिहारमध्ये पंचायतीने अजब शिक्षा दिली. पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगितल्या नंतर सोडून दिलं. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

- Advertisement -

पोलिसांनी घेतली दखल

हा प्रकार नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावात घडला. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पोल्ट्री फार्मवर नेऊन बलात्कार केला होता. मात्र पंचायतीने आरोपीला पोलिसांकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, आरोपी बलात्काराचा दोषी असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. मुलीला एका निर्जनस्थळी नेलं असल्याने पंचायतीने आरोपीला ही शिक्षा सुनावली. पंचायतीने आरोपीला शिक्षा म्हणून पाच उठाबशा काढायला लावल्या.

गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. दरम्यान हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचीही पोलीस चौकशी करणार असून, कारवाईची शक्यता आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या