Sunday, November 27, 2022

मुलांची पप्पी घेतली अन् लुटला 3 कोटींचा ऐवज

- Advertisement -

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

लातूर येथे कन्हैय्या नगरमध्ये असलेल्या राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यावर दि.12 रोजी पहाटे अज्ञात दरोडोखोरांनी दरोडा टाकला. या घटनेने लातूरमध्ये मोठी खळबळ माजली असून नागरिकांंमध्ये भितीचीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मोठी धाडसी चोरी

शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 2 कोटी 98 लाख 9 हजार 500 रुपयाचा ऐवज लुटला. हे दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील असल्याचं बोलले जात आहे. या प्रकरणी आकाश राजकमल अग्रवाल (वय 32) यांच्या फिर्यादीवरुन विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पाच अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. एवढी मोठी धाडसी चोरी झाल्याने लातूर शहरात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान ही चोरी पूर्वनियोजीत कट रचून केल्याचेही बोलले जात होते.

लेकरांची पप्पी घेतली 

याबाबत माहिती अशी की, कातपूर रोड परिसरातील कन्हैय्या नगरातील अग्रवाल यांच्या बंगल्यात बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोर शिरले. त्यांच्या हातात त्यांनी राजकमल अग्रवाल यांना जागे करुन त्यांच्या गळ्याला चाकू लावला. हत्याराचा धाक दाखवत त्यांनी अग्रवाल त्यांच्या पत्नी मुलगा व अन्य सदस्यांचे मोबाईल काढून घेतले. मात्र कोणालाही इजा केली नाही, उलट दोन लेकरांची पप्पी घेतली आणि घाबरु नका असे सांगितले. तसेच पतीच्या गळ्यातील लॉकेट देवाचे आहे हो, असं अर्जव करताच ताई घाबरु नका म्हणून त्यांनी ते लॉकेट सोडून इतर सोन्याचे दीड किलो दागिने आणि तब्बल दोन कोटी रुपय रोख रक्कम लंपास केली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या