मुंबई : सध्या राज्यात मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आहे. शिंदेसोबत ३० आमदार देखील आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.
राज्यात काही वेळांत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार होती.
मात्र याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यात नेमकं काय घडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post
Next Post