Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    जळगाव

    सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2026No Comments835 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चांदी तब्बल 8700 रुपयांनी स्वस्त : ग्राहकांना दिलासा
    मुंबर्इ
    सोन्या-चांदीच्या किमतीत शुक्रवार दि. 15 मे रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी खरेदीची मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरात तब्बल 8 हजार 790 रुपयांची घसरण झाली आहे.
    मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 जून 2026 एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर्स वायदा व्यवहार सुमारे 1,425 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. सोने 1,60,790 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले होते. मागील सत्रात सोन्याचा भाव 1,61,978 रुपयांवर बंद झाला होता. सकाळी सुमारे 9:55 वाजेपर्यंत सोन्याचा वायदा 0.88 टक्क्यांच्या घसरणीसह 1,60,553 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने 1,60,992 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 3 जुलै 2026 एक्सपायरी असलेल्या चांदीच्या वायद्यात 3.02 टक्के म्हणजेच तब्बल 8,790 रुपयांची घसरण झाली. चांदीचा व्यवहार 2,80,000 रुपयांवर सुरू झाला होता. दिवसातील व्यवहारादरम्यान चांदीने 2,83,219 रुपयांचा उच्चांक गाठला. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅम चांदीचा दर 2,900 रुपये आहे. तर 100 ग्रॅम चांदी खरेदीसाठी ग्राहकांना 29,000 रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीचा भाव 3,050 रुपये आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif