बालाजी महाराज यात्रोत्सवातील पाळण्यासाठी प्रथमच लागली बोली
पहिल्यांदाच साडेतीनशे वर्षाच्या परंपरेला फाटा : शहरवासियांमध्ये चैतन्य : १९ लाख ८३ हजारांच्या राशीवर शिकामोर्तब
देऊळगाव राजा
उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी घेत असणाऱ्या नियोजन मिटिंग दरम्यान अकरा महिने, एक महिना या फॉरमूल्यानुसार लावलेल्या बोलीत प्रशासन आणि संस्थानच्या क्लुप्तीमुळे बालाजी महाराज पेढीत एकोणीस लाख त्र्यऐंशीरुपये जमा होणार असून साडेतीनशे वर्षाच्या परंपरेला फाटा देत एक अभिनव उपक्रम सुरू केल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ साहेब यांचे बंधू लखुजीराव जाधव यांचे पुत्र राजे जगदेवराव जाधव यांनी अनुभवलेल्या दृष्टांता नुसार आपल्या देवघरात तिरूपती बालाजीचे प्रतिरूप म्हणून व्यंकटेश बालाजी महाराज यांच्या हिऱ्याची अंगठ्याच्या आकाराची मूर्ती १६९२ मधे स्थापन करून देऊळगाव येथील अठरापगड जातीला मानसन्मान देऊन प्रत्त्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निश्चित करुन दिल्या. तेंव्हापासून आजतागायत ही परंपरा कायम आहे.
विजयादशमीच्या दिवशी ५० फूट उंचीच्या २१ लाकडी लाटा आणि त्यावर ४२मंडप हे विजयादशमी पासून चतुर्थी पर्यंत बालाजी महाराज आगमनाचे प्रतीक मानले जाते. उत्सवाचे स्वरूप काळा नुसार बदलत चालले असून बालाजी महाराज संस्थानची यात्रेकरता एक महिना जागा उपलब्ध असते. तद्नंतर अकरा महिने ही नगरपालिका आठवडी बाजार भरविते. २०२५ चे यात्रा नियोजक प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी तहसीलदार, आणि मुख्याधिकारी किंवा प्रशासक आणि बालाजी महाराज संस्थानचे विश्वस्त परंपरे नुसार राजेंद्रसिंह यांचा वारसा पुढे घेऊन जणारे विश्वस्त राजे विजय सिंह जाधव यांनी बदलत्या काळा नुसार आणि काही विघ्नसंतोषी असलेल्यांकडून गेली कित्येक वर्षे यात्रेला मूर्त स्वरूप मिळावे म्हणून एका वर्गाकडून जागा वाटप समितीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत असत.
पारदर्शकता यावी म्हणून मागितलेल्या अर्जानुसार तीन अंकी अर्ज आले. जागा उपलब्ध फक्त दोन अंकी क्लुप्ती लढवून बोली म्हणजे ह्रर्राशी मधून जागा वाटप एका व्यक्तीला एकच जागे प्रमाणे झालेल्या बोलीत संस्थानला लाखाच्या वर राशी मिळणार आहे. त्यामुळे साडेतीनशे वर्षाच्या परंपरेला बदलत्या काळानुसार प्रसंगावधान राखुन बोललेल्या बोलीने बालाजी महाराज पतपेढीत लाखोची भर पडणार एवढे मात्र नक्की.