पारगाव शिवारात बिबट्याचे दर्शन ; शेतकरी , मजूर धास्तावले !
वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
धानोरा ता. चोपड़ा (प्रतिनिधी);- येथून जवळ असलेल्या पारगाव शिवारात दि. ११ रोजी रात्री शेतकऱ्यांना पाटचारी जवळ बिबट्या दिसल्यामुळे शेतकऱ्यां मंध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यमध्ये काही ठिकाणी बिबट्याने हल्ला करून एका ७ वर्षीय मुलावर हल्ला केला तर एका कुत्र्यावर हल्ला केला त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
दि. ११ रोजी रात्री येथील शेतीकरी आपल्या शेतात जात असतांना त्यांना बिबट्या दिसल्यामुळे त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला मजुर दिवसाही कामाला जात नाही त्यामुळेबिबट्याचा वावरामुळे धास्ती निर्माण झाली आहे.
तर गावागावात दंवडी देवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे सध्या गहू हरभरा मका हंगाम असून तो अंतिम टप्यात आला आहे त्यामुळे महावितरण कंपनीने रात्रीचा विद्युत पुरवठा बंद करून दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा. जेणेकरून बिबट्याच्या हल्ल्यात जिवीत हानी होणार नाही व वनविभागाने तत्परतेने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे