Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पित्याच्या प्रसंगावधानामुळे सहा वर्षीय बालक बचावला !
    जळगाव

    पित्याच्या प्रसंगावधानामुळे सहा वर्षीय बालक बचावला !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 4, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पित्याच्या प्रसंगावधानामुळे सहा वर्षीय बालक बचावला !

    डोंगरकठोरा परिसरातील धुळे पाडा येथील थरारक घटना

    यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील डोंगरकठोरा गावाजवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या धुळे पाडा या आदिवासी वस्तीतील सहा वर्षीय बालकावर गुरुवारी सायंकाळी बिबट्याने अचानक हल्ला चढवला. मात्र, वडिलांच्या धाडसी आणि प्रसंगावधानपूर्ण कृतीमुळे बालकाचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    धुळे पाडा येथील रहिवासी इगरा झेंदला बारेला (वय २८) हा गुरुवारी सायंकाळी आपल्या महेश (वय ६) या मुलासोबत गवत आणण्यासाठी शेतात गेला होता. गवताचे ओझे डोक्यावर घेत दोघे परतत असताना अचानक मागून बिबट्याने बालकावर झडप घातली. या हल्ल्यात बिबट्याने बालकाच्या डोक्याला आणि मानेजवळ चावा घेतल्याने गंभीर जखमा झाल्या.

    बालक किंचाळताच वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता डोक्यावरचे गवताचे ओझे थेट बिबट्याच्या अंगावर फेकले आणि जोरात आरडाओरडा केला. अचानक प्रतिकार झाल्याने बिबट्याने मागे हटून जंगलाच्या दिशेने पळ काढला.

    जखमी बालकाला तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर व अमोल अडकमोल यांच्या पथकाने तातडीने उपचार केले. त्यानंतर शुक्रवारी बालकाला पुढील उपचारांसाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

    या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात पथक तैनात करण्यात आले आहे. ग्रामीण भागात या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    bibtya halla Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif