कंपनीत मोठा स्फोट; दोन कर्मचारी जागीच ठार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील एका कंपनीत वेल्डींग करतांना स्फोट झाल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील ऑईल टाकीला दोन कर्मचारी वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंग करतांना अचानक शार्टसर्किमुळे मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत काशिनाथ सुरवाडे रा. खेडी रोड जळगाव आणि खेमसिंग पटेल रा. बेमतेरा. छत्तीसगड या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या स्फोटादरम्यान मोठा आवाज झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. घटनास्थळी परिसरातील नागरीकांना धाव घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेतली आहे. मयत झालेले कर्मचाऱ्यांची अधिक माहिती घेतली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here