भुसावळचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील जुना बंधारा पुन्हा थोडा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल का? यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बंधाऱ्याच्या पाहणी करण्यात आली. उपनगराध्यक्ष गटनेते युवराज लोणारी आणि सर्व नगरसेवक या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. हा बंधारा तापी नदीमध्ये रेल्वे खात्याचे रेल्वे खात्याने बांधलेला आहे. त्यामुळे रेल्वे खात्याच्या परवानगीशिवाय या बंधाऱ्यावर काम करता येणार नाही. एका बाजूला बंधारा थोडा खचला आहे. त्यामुळे तेथून पाणी जाते. तरी तो खचलेला भाग रेल्वेच्या परवानगीने परत डागडूजी करण्यात येईल का? यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अन्यथा आहे तसेच ठेवावे लागणार आहे. अजून अमृत योजनेला दीड वर्ष लागणार आहेत. या दीड वर्षांमध्ये पाणी जैसे थे भुसावळकरांना मिळणार आहे. सध्या भुसावळ शहरवासीयांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा मिळतो. तो पाणीपुरवठा तसाच राहण्याची शक्यता आहे. आता येत्या उन्हाळ्यामध्ये भुसावळ वासियांनी दहा दिवसाआड पाणी मिळाले तरी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात एकदा दहा दिवसाआड पाणी पुरवठा राहील. त्यानंतर दीड वर्षांनी भुसावळकरांना अमृत योजनेचे पाणी मिळेल. त्यासाठी पाण्याची टाकी तयार व्हायची आहे. ती झाली पाहिजे. त्यानंतर जॅकवेल आणि त्यानंतर शुद्ध शुद्धता केंद्र उभारण्यात येईल. मग हे सर्व सुरळीत झाले तर सर्व काही अमृत योजने योजना सुखकर होऊन भुसावळकरांना नियमित पाणीपुरवठा व तोही शुद्ध पाणीपुरवठा होईल. त्यासाठी भुसावळचे भाजपचे नगरसेवक म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासाठी राजकारण आम्ही करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी ही पिण्याच्या पाण्यात राजकारण करू नये. पाहूया काय होते. ते चार वर्ष प्रशासकीय राजवटीत गेले. त्यात बरेच काही काम झाले आता सत्ताधाऱ्यांनी राजकारण न करता पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे..!

Leave A Reply

Your email address will not be published.