महिलेचे बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातील श्रीनगर परिसरात राहणाऱ्या महिलेचे बंद घर फोडून २ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमा अर्जुन ढोलपूरे (वय २७, रा. श्रीनगर विठ्ठल मंदीरासमोर भुसावळ) हे २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान त्या बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. यात एकुण १ लाख रूपयाची रोकड आणि १ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५६ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी सदर महिलेने भुसावळ शहर पोलिसात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.