भुसावळमध्ये तीन तलवारींसह आरोपी तरुणास अटक

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी भागात २३ वर्षीय तरुणास तीन धारदार तलवारीसह अटक करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील मस्जिदसमोर गुलाम गौस कालू शहा (वय 23, रा. मुस्लिम कॉलनी) या तरुणाकडे घातक शस्त्र असल्याची गोपनीय माहीती भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.

त्यानुषंगाने त्यांनी बुधवारी पहाटे कारवाईचे आदेश दिल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील एएसआय शरीफोद्दीन काझी, कॉन्स्टेबल जावेद हकीम शहा, कॉन्स्टेबल सचिन पोळ, कॉन्स्टेबल अक्षय चव्हाण व योगेश माळी आदींच्या पथकाने तरुणाच्या घरी बुधवारी पहाटेच्या सुमारास धडक देत घराच्या गच्चीवरून तीन धारदार तलवार जप्त केल्या.

याप्रकरणी संशयीत आरोपी तरुणाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुरनं.208/2022, भादंवि 4/25 प्रमाणे कॉन्स्टेबल जावेद हकीम शहा यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.