Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»भुसावळ नगराध्यक्षांचे जात प्रमाणपत्र अवैध; राजकीय वर्तुळात खळबळ
    ताज्या बातम्या

    भुसावळ नगराध्यक्षांचे जात प्रमाणपत्र अवैध; राजकीय वर्तुळात खळबळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 25, 2026No Comments924 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ | भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जळगाव येथील जात पडताळणी समितीने दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
    भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने गायत्री भंगाळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रजनी सावकारे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी एस.सी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर केले होते, जे भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले होते. नियमानुसार निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. समितीच्या अध्यक्षा नयना बोदर्डे तसेच सदस्य एन. एस. रावते आणि एस. एस. महाजन यांच्या समितीने सादर कागदपत्रांची तपासणी करून भंगाळे या अनुसूचित जाती प्रवर्गात येत नसल्याचे नमूद केले. प्रमोद सावकारे, रजनी सावकारे, संजय तायडे आणि राहुल तायडे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, संबंधित प्रकरणात भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांवरही कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या निर्णयामुळे गायत्री भंगाळे यांच्या नगराध्यक्षपदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली असून, पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    September 15, 2026

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif