कुख्यात गुन्हेगारी टोळीतील सात जणांवर ‘मोक्का’

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याच्यासह त्याच्या टोळीतील सात जणांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत आणि त्याच्या सहकार्‍यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांवर हल्ला केला होता. हाच निखिल राजपूत व टोळीतील सहा साथीदार अशा ७ जणांविरुद्ध दाखल ‘मोक्का’ म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

लवकरच नियनामुनार मोक्काची कारवाई झालेल्या राजपूत टोळीतील सर्व ७ जणांना पोलिस अटक करून रवानगी कारागृहात करतील. नंतर सहा महिन्यांत पोलिसांना न्यायालयात संबंधितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करावे लागेल. त्यात तपास पूर्ण न झाल्यास पुन्हा मुदतवाढीची विनंती पोलिस करू शकतात.

दरम्यान, राजपूत व त्याचे साथीदार हे पोलिसांवरील हल्ल्याच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आहेत. आता मोक्काची कारवाई झाल्याने त्यांचे जामीन रद्द करावे, असा अर्ज पोलिस प्रशासनाने न्यायालयात दिला असून यावर आज सुनावणीची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.