Sunday, November 27, 2022

गावठी कट्टयाने दहशत पसरवणारे दोन तरूण अटकेत

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भुसावळ शहरात गावठी कट्टा बाळगून दहशत पसरवणार्‍या दोन तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भुसावळ शहरात अनेकदा गावठी कट्टे आढळून येत असतात. दरम्यान गावठी कट्टा घेऊन दोन तरूण दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या अनुषंगाने एलसीबी आणि बाजारपेठ पोलीस स्थानकांनी संयुक्त कारवाई करून या दोघांना ताब्यात घेतले.

या कारवाईमध्ये अक्षय प्रताप न्हावकर उर्फ थापा (वय २४, रा. चक्रधर नगर, भुसावळ) व ऋतिक नरेश चौधरी (वय २३, रा. पंचशील नगर, भुसावळ) या दोघांना अटक केली असून नीलेश चंद्रकांत ठाकूर हा मात्र पलायन करण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या