गुन्ह्याच्या तयारीत असणार्‍या तिघांना गावठी कट्टयासह अटक

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरात गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत असणार्‍या तिघांकडून गावठी कट्टा जप्त करत त्यांना गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई बाजारपेठ पोलिसांनी केली.

वांजोळा रोड भागात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने कारवाई करून तिघांना अटक केली. काही संशयित पिस्तूल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, सापळा रचून केलेल्या कारवाईत तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली.

दरम्यान तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी (एमएच.१९-डीसी.८८६०) जप्त करण्यात आली. पोलिस नाईक नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सदर कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश गोंटला, गणेश धुमाळ, हरीष भोये, उपनिरीक्षक महेश घायतड, रमण सुरळकर, नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींनी केली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.