भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका व्यक्तीने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच परिसरात खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरात ही घटना घडली. ५२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. दिगंबर बडे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे गंगाराम प्लॉट परिसरात ५२ वर्षीय व्यक्तीने आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दिगंबर बडे असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती समोर आली नाही. या घटनेमुळे भुसावळ शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
दिगंबर बडे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवले. काही दिवसांपासून त्यांचा पत्नीशी वाद सुरू होता. या वादातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. दिंगबर यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी माहेरी गेल्यामुळे आणि सततच्या वादाला कंटाळून दिगंबर यांनी टोकाचे पाऊस उचलले. त्यांनी घरामध्ये कुणी नसताना आपल्या खोलीमध्ये जाऊन बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिगंबर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दिगंबर यांनी आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक विनापरवाना असून त्यामध्ये एकच गोळी असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.


