Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»२५ लाख ४२ हजाराच्या चोरीचा अवघ्या ४८ तासांत छडा! 
    उत्तर महाराष्ट्र

    २५ लाख ४२ हजाराच्या चोरीचा अवघ्या ४८ तासांत छडा! 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 1, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    २५ लाख ४२ हजाराच्या चोरीचा अवघ्या ४८ तासांत छडा! 

    ​कंपनीच्या ड्रायव्हरनेच रचला कट; सहा आरोपी अटकेत, २३.४२ लाखांची रोकड आणि मोबाईल जप्त

    ​भुसावळ प्रतिनिधी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या २५ लाख ४२ हजार रुपयांच्या सनसनाटी दरोड्याचा गुन्हा भुसावळ पोलिसांनी केवळ ४८ तासांच्या विक्रमी वेळेत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना गजाआड केले असून, त्यांच्याकडून तब्बल २३ लाख ४२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण कटाचा सूत्रधार फिर्यादी व्यक्तीच्याच कंपनीतील ड्रायव्हर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या जलद व प्रभावी कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    ​‘रॉयल कंपनी’त कार्यरत असलेले फिर्यादी मोहम्मद यासीन इस्माईल हे २८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजता कंपनीतील २५.४२ लाख रुपयांची रोकड मोटारसायकलवरून घेऊन घरी जात होते. खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांना पाडले आणि त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
    ​
    ​गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. तपासामध्ये पोलिसांचा संशयाचा काटा फिर्यादीचे ड्रायव्हर शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) याच्याकडे वळला. कसून चौकशी केल्यावर त्यानेच हा दरोड्याचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानेच साथीदारांना पैसे घेऊन जाण्याच्या वेळेची अचूक माहिती पुरवून ‘टीप’ दिली होती.
    ​
    ​शाहीद बेगने अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे रोकड असल्याची माहिती मुजाहीद आसीफ मलीक (वय २०) आणि मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९) यांना दिली. या दोघांनी पुढे हा कट अजहर फरीद मलक (वय २४), अमीर खान यूनुस खान (वय २४) आणि इंजहार बेग इरफान बेग (वय २३) – (रा. रसलपूर, ता. रावेर) यांना सांगितला. गुन्ह्याच्या रात्री शेवटच्या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन फिर्यादीकडून रोकड लुटली.
    ​
    ​पोलिसांनी आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून, उर्वरित रकमेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सर्व आरोपींना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.
    ​
    ​तपासात उघड झाले की, मुख्य आरोपी शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा यापूर्वीच नोंद आहे.
    ​
    ​उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका), राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ) आणि राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या विशेष पथकाने अत्यंत नियोजनबद्ध तपास करून हा गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणला. या कारवाईत पो.उपनिरीक्षक रवी नरवडे यांच्यासह गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, पुजा अंधारे, संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितू ठाकरे, योगेश माळी, भूषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, प्रमोद पाटील आदी कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #bhusawal #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif