Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळचा बेपत्ता तरुण जगन्नाथ पुरीत सापडला !
    गुन्हे वार्ता

    भुसावळचा बेपत्ता तरुण जगन्नाथ पुरीत सापडला !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 1, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नशिराबाद पोलिसांच्या तपासाला यश

    जळगाव (प्रतिनिधी) : तब्बल दोन महिने बेपत्ता झालेल्या भुसावळ येथील १८ वर्षीय जय संजयकुमार जावरे या तरुणाचा शोध नशिराबाद पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने ओडिशातील जगन्नाथ पुरी येथे लावला. अखेर जय याला सुखरूप जळगावला आणून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी तपासपथकाचे कौतुक केले.

    जय जावरे हा १७ जुलै रोजी घरातून न सांगता निघून गेला होता. त्याचा मोबाईल बंद असल्याने ठावठिकाणा लागत नव्हता. १८ जुलै रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद झाली होती. सहा. पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने बँक व्यवहार तपासले असता तो जगन्नाथ पुरी येथे असल्याचे लक्षात आले.

    यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून ठिकाणा निश्चित केला. तपास पथकाने दोन दिवस प्रयत्न करून जयला शोधले आणि २० सप्टेंबर रोजी पालकांच्या स्वाधीन केले. या प्रयत्नामुळे कुटुंबाला दिलासा मिळाला असून संपूर्ण घटनेचे पोलिस अधीक्षकांकडून कौतुक करण्यात आले.

    #bhusawal #crime CYBAR POLICE JAGANNATH PURI
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif