भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
विश्व हिंदू परिषद शाखा भुसावळ सामाजिक समरसता विभागातर्फे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक समरसता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ हुडको कॉलनी गजानन महाराज मंदिर येथून झाला. हनुमान नगर, दत्तनगर, वांजोळा रोड, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, श्रीराम नगर, दीनदयाल नगरमधील न.पा.शाळा क्रमांक 35 येथे यात्रेचा समारोप करण्यात आला.
या यात्रेमध्ये शहरातल्या विविध भागांमध्ये पत्रक वाटप करण्यात आले. हिंदू म्हणून आपण सर्वांनी जातीपातीचा भेद विसरून एकत्र आले पाहिजे, सद्यस्थितीत हिंदू समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना सोडवायचे असल्यास जाती संप्रदाय, पंथ यांच्या भिंती दूर करून आपण सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे असा प्रचार आणि प्रसार या यात्रेच्या निमित्ताने करण्यात आला.
या यात्रेच्या समारोप कार्यक्रमात नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे सहकार्य लाभले. यात्रेच्या यशस्वीतेसाठी सामाजिक समरसता जिल्हाप्रमुख योगेंद्र हरणे, शहर प्रमुख रविंद्रनाथ खरात, गोपी सिंह राजपूत, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते दिलीप कलाल, मनोज मिनदाणे, सुमीत नाईक, आकाश राजपूत, वैभव पाटील, संजय यावलकर यांचे सहकार्य लाभले.