भुसावळ , लोकशाही न्युज नेटवर्क
भुसावळ शहरालगत असलेल्या तापी नदीच्या पुलावर दुचाकी लावून तरुणाने थेट नदीत उडी घेतली.
यावल शहरातील बोरावल गेट परिसरातील लखन संजय कोळी (वय २८) असे या तरुणाचे नाव आहे. लखन हा आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह राहत होता. लखन कोळी हा मंगळवारी दुपारी साडेतीनला मोटरसायकल घेऊन भुसावळला गेला. यानंतर त्याने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर मोटरसायकल लावून नदीपात्रात उडी घेतली.
दरम्यान हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सदर तरुण यावल शहरातील बोरावल गेट भागातील असल्याचे समजताच शहरातील अनेक नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध नदीत सुरू होता. मात्र तो आढळून आला नाही. आज सकाळी पुन्हा नदीपात्रात त्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.