Friday, May 20, 2022

भुसावळात बारागाड्यां ओढतांना झालेल्या दुर्घटनेत एक तरूण जागीच ठार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भुसावळ;  सातारे गावाची ग्रामदेवता असणार्‍या मरीमातेच्या यात्रोत्सवातील बारागाड्या ओढतांना झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

सातारे गावातील मरिमातेची दरवर्षी यात्रा भरत असते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती. यामुळे यंदा यात्रेत मोठ्या प्रमाणात उत्साह होता. परंपरेनुसार यात्रेच्या दिवशी सूर्य मावळतीला असतांना बारागाड्या ओढण्यात येतात.

पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पेट्रोल पंपापासून ते जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरापर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात. एक भगत बारागाड्या ओढत असून त्याच्या सोबत दोन बगले असतात. तर उपस्थित भाविक बारागाड्या ओढत असतात.

आज परंपरेनुसार सायंकाळी बारागाड्या ओढण्यास प्रारंभ झाला असता काही मिनिटांमध्येच यातील काही गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे झालेल्या अपघातात गिरीश रमेश कोल्हे (42, गवळीवाडा, भुसावळ) हे जागीच ठार झाले.

तर भाविक छोटू उत्तम इंगळे (33, कोळीवाडा, भुसावळ), धर्मराज देवराम कोळी (63, जुना सातारा, भुसावळ), मुकेश यशवंत पाटील (28, खळवाडी, भुसावळ) व शिक्षक नितीन सदाशीव फेगडे (गणेश कॉलनी, भुसावळ) हे चौघे भाविक जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या