रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर येथील सौ. कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी कू. भूमिका यशवंत दलाल हिला इ. 10वी मध्ये 97 टक्के गुण मिळाले. तिचा रावेर केंद्रातूनच नव्हे तर रावेर तालुक्यातून पहिला नंबर आला आहे. ती रावेर येथील मा. नगरसेवक यशवंत वासुदेव दलाल यांची मुलगी तर रावेर येथील प्रगतिशील शेतकरी वासुदेव भिकू वाणी यांची नात आहे.
तिच्या या यशाबद्दल तिच्यावर तिच्या मैत्रिणी, नातेवाईक, हितचिंतक यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच रावेर शिक्षण संवर्धक संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक डॉ. दत्तप्रसाद माधव दलाल यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

