Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»अस्वस्थ वाटू लागल्याने भुजबळ उपचारासाठी रुग्णालयात
    आरोग्य

    अस्वस्थ वाटू लागल्याने भुजबळ उपचारासाठी रुग्णालयात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे भुजबळ दौरा सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्या अचानक पोटात दुखू लागल्याने अपोलो हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन करण्यात आले. त्यांचे नाशिकचे सगळे कार्यक्रम रद्द करून भुजबळ मुंबईत उपचारासाठी रवाना झाले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. यापूर्वी भुजबळांवर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

    राज्याच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत आहेत. त्यांच्यावर गेल्या वर्षाच्या अखेरीस हृदय शस्त्रक्रिया झाली होती. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते अनेक दिवस सामाजिक आणि राजकीय मंचापासून दूर होते. तर डॉक्टरांच्या परवानगीने एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तर माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुध्दा त्यांच्या भेटीला त्यावेळी रुग्णालयात गेले होते.

    तर दोन वर्षांपूर्वी 2024 मध्ये छगन भुजबळ हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी आणि उपचारानंतर ते पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय झाले होते. एक अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी ओबीसी चळवळीच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातही मोठे काम केले. ओबीसी नेते म्हणून त्यांनी अनेकदा मोठी भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलनाच्या वेळी त्यांनी ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरत लढा दिला. त्यांनी अनेकदा जहाल शब्दात काही घडामोडींवर प्रखर भाष्य केले आहे.

    रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जे वक्तव्य केले. त्यांच्यावर कालच छगन भुजबळ यांनी टीका केली. विलिनीकरणानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष होणार होते असा दावा रोहित पवारांनी केला होता. त्या वक्तव्याचा समाचार भुजबळांनी घेतला. आम्हाला विलिनीकरणाविषयी काहीही माहिती नाही आणि अजितदादा सुद्धा याविषयी काही बोलले नाही असा दावा भुजबळांनी केला.विलिनीकरणाअगोदरच रोहित पवारांनी बहतांशी निर्णय आणि पदांचे वाटप केले की काय असा टोलाही भुजबळांनी रोहित पवारांना लगावला.

    Apollo Hospital Cardiologist Dr. Ramakant Panda Chhagan Bhujbal CityScan Dhananjay Munde Heart Surgery Minister of Food and Civil Supplies Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.